संजय येरणे यांची कथा स्वकेंद्रित आत्मानुभव गुंफत जाते. कथेतील पात्र, संवाद व कथानकाला एका जाळ्यात विनतांना ती शेवटी सुखांत, दुःखातांच्या अपेक्षेमध्ये न पडता वाचक रसिकांना आपलीसी करीत, मनाच्या कोप
संजय येरणे यांची कथा स्वकेंद्रित आत्मानुभव गुंफत जाते. कथेतील पात्र, संवाद व कथानकाला एका जाळ्यात विनतांना ती शेवटी सुखांत, दुःखातांच्या अपेक्षेमध्ये न पडता वाचक रसिकांना आपलीसी करीत, मनाच्या कोपऱ्यात ती सदैव तरळतच राहते.... अनादी प्रश्न विचारांचे थैमान आणि माणुसकीचा आग्रह धरणारी तेवढीच समाजात अस्तित्वात असलेल्या मनभावनेतील विविध पैलू वाचकांना निरीक्षणात्मक नोंद घ्यावयास लावून परिवर्तनाचा टाहो मांडणारी ही कथा होय. कथा वाचतांना मला तरी वाटते, नामदेव तुकारामाचे अभंग आज शेकडो वर्षानंतरही भावार्थाने जसे समाजनिकडीचे ठरताहेत तेवढेच जनमनात उरताहेत. अगदी तसेच संजय येरणे यांची कथा ही शेकडो वर्षानंतरही मानवी मनात आंदोलने उभी करणारी काळाच्या गर्तेत दृष्टीआड न होता जनमनात चपखल बसत उरणारी कथा आहे.