जीवनाचं माळरान फुलविण्यास आपुलकीची जिव्हाळयाची साथ मिळावी पण सारं व्यर्थ ठरतं, मन उदास होत जातं, तरीपण असच जगावं जीवनाशी झुंज देत, बयरीसारखं........ बयरी हे कथानक काल्पनिक, मनोरंजनात्मक असले तरी
जीवनाचं माळरान फुलविण्यास आपुलकीची जिव्हाळयाची साथ मिळावी पण सारं व्यर्थ ठरतं, मन उदास होत जातं, तरीपण असच जगावं जीवनाशी झुंज देत, बयरीसारखं........ बयरी हे कथानक काल्पनिक, मनोरंजनात्मक असले तरी ही कथा ग्रामीण जीवनातील वास्तव व करूणामयी विचाराला जपणारी आहे. यात प्रसंग हे नाविण्यपूर्ण असून काही प्रसंग हे प्रयोगात्मक साकार केले आहेत. आमची झाडीबोली यातील बरेचसे संवाद यात डोकावतात. यामुळे या कादंबरीला प्रादेशिकतेचा दर्प आलेला आहे. ही साहित्याप्रांतात रसिकांना आवडेल अशीच कथा आहे. काही माणसे अनुभवाच्या शिदोरीतून हे सारं जीवन समजून घेत एक माणूसपण सांगतात नव्हे तर जपतात. असंच माणूसपण रूजवणारी ही संदर्भकथा .....